Monday, November 17, 2008

२५.८.२००३
समुद्र
दुडदुडत्या पावलांना
खळाळत बिलगणारा

भन्नाट वारा घेऊन
आवेगाने
पदरात धुसमुसळणारा

दुख-या जीवाला
सांत्वनाची
हळुवार गाज देणारा

प्रौढ चिंतनात
शांत विसावणारा

कलत्या संध्याकाळी
सरल्या स्मृतींत
रमणारा

समुद्र
सारे भाव सामावाणारा
समुद्रासारखाच
२२.८.३

धुके ओसरावे
हा अट्टाहास का ?

वृथा ही आस
अथांग द-यांची !




आतुर सूर्य
नक्षत्रं धुंडत
आकाशमाळ हिंडतो

कृष्णविवराला भीत कसा नाही ?
२३.८.३
रचलेल्या वनावरुन
ही झुळूक निघून जाईल;
जायलाच हवी

सोसाटा होणारच नाही याचा
कोणी द्यावा भरवसा ?

Sunday, November 16, 2008

१७.१०.८
वाटा खोळंबून राहतात
बियास संथ होते
प्रपात स्तब्ध
देवदार गोंधळलेले

फुले कोमेजून जाणारच
का जपावीत ?
आजच्या कळ्या
उद्या उमलणारच
त्याही कोमेजणारच सायंकाळी
...म्हणजे आपण फुललेल्या टपो-या क्षणातच
सीमित व्हावे
असेच ना?






...मुकेशचे हे गाणे मनात गुंजत असतानाच 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' मध्ये हा फलक सामोरा आला.
ऑगस्ट २००० मध्ये.
अजूनही तो रोमांच ताजाच.

१६.११.८
एखाद्या कोवळ्या सकाळी सिक्‍कीमचे तळे आठवते
सब्‍ध, शांत...
अथांग अवकाशाच्‍या घुमटात एक समाधीनाद भरुन राहिलेला
पंखांची चाहूल लागू न देता
एखादाच पक्षी अलगद उडत चाललेला.
...मन असेच हवे नाही ?
सिक्‍कीमच्‍या तळ्यासारखे