१
उत्तररात्री
हलक्या प्रहरी
निरव जाग येते...
भुतांची निघायची वेळ ही
हळुवार कुजबुज सुरु होईल त्यांची
...आपण डोळे बंद करुन घ्यावेत
म्हणजे कमी ऐकायला येईल आपल्याला.
२
विषण्णतेचा पहाटपसारा
गाज लाटांत गुडूप
क्षितीज काळेभोरे
मलूल शिड
सुस्तावलेला नांगर
-कप्तान टवटवीत
...उपयोग काय ?
संबद्ध, असंबद्ध, पूर्ण, अपूर्ण, उमललेलं, उमळलेलं, उन्मळलेलं असं काही; गद्य तसंच अगद्यही. ...हे एक संज्ञाप्रवाही आत्मगुज.
Friday, July 9, 2010
Wednesday, July 7, 2010
९.३.१०
उन्मत्त हत्तींची
अवशिष्ट नगरीतील मुशाफिरी
अवचित
तरीही
सस्वागत;
हादरे, कंप, भयभीतता
उध्वस्तता...
- हवेच होते हे !
६.३.१०
जगण्यात सत्व नव्हते
मरणास मोल नाही
तरीही का खुणावे
आकाशाची निळाई
विद्ध सारी इंद्रिये
अन् सुन्न जाणिवाही
मात्र दूर समुद्राची
गाज निनादत राही
७.७.१०
काय भयानक आहे जुन्या डायऱ्या वाचणे !
भूतकाळाचा अख्खा पहाड कोसळला अंगावर;
कसा तरी निघालो बाहेर बचावून
धापा अजून चालूच आहेत.
उन्मत्त हत्तींची
अवशिष्ट नगरीतील मुशाफिरी
अवचित
तरीही
सस्वागत;
हादरे, कंप, भयभीतता
उध्वस्तता...
- हवेच होते हे !
६.३.१०
जगण्यात सत्व नव्हते
मरणास मोल नाही
तरीही का खुणावे
आकाशाची निळाई
विद्ध सारी इंद्रिये
अन् सुन्न जाणिवाही
मात्र दूर समुद्राची
गाज निनादत राही
७.७.१०
काय भयानक आहे जुन्या डायऱ्या वाचणे !
भूतकाळाचा अख्खा पहाड कोसळला अंगावर;
कसा तरी निघालो बाहेर बचावून
धापा अजून चालूच आहेत.
Tuesday, January 5, 2010
काहीतरी उफाणणारे, उसळणारे, पिळवटणारे
...थडगी उकरण्याचा परिणाम आणखी काय असतो ?
क्रुसाला तेवढे हलवू नको, ही सूचना ऐकणे थोडेच आपल्या हातात असते ?
सारी भळभळ मोकळी झाली की सारे कसे शांत..शांत !
स्मशानाहून ‘शांत’ जागा नाहीच का दुसरी ?
थोड्या वेळाने चंद्र उगवेल.
स्मशानाच्या कुंपणावरुन हलकाच वर येईल.
क्रुसावर चांदणे बरसू लागेल.
मी मोर होईन. अन् स्मशान- आषाढ.
...थडगी उकरण्याचा परिणाम आणखी काय असतो ?
क्रुसाला तेवढे हलवू नको, ही सूचना ऐकणे थोडेच आपल्या हातात असते ?
सारी भळभळ मोकळी झाली की सारे कसे शांत..शांत !
स्मशानाहून ‘शांत’ जागा नाहीच का दुसरी ?
थोड्या वेळाने चंद्र उगवेल.
स्मशानाच्या कुंपणावरुन हलकाच वर येईल.
क्रुसावर चांदणे बरसू लागेल.
मी मोर होईन. अन् स्मशान- आषाढ.
Subscribe to:
Posts (Atom)