Friday, February 7, 2014

७.२.१४ 

संध्याकाळ थांबली अन् ती आली;
फारा दिसांनी.

कातरवेळ गडद
तरीही मोरपंखी पाती लकाकली.

आता घाव मोजणे निरर्थक.

तयार राहावे हात खुपसून
रात्रीत;
हेच खरे.